बेळगावमध्ये भाजप कर्नाटक राज्याध्यक्ष नलीन कुमार कटील यांच्या अध्यक्ष्यतेखाली शनिवार दिनांक २३ जानेवारी रोजी बेळगावमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी कर्नाटक राज्याध्यक्ष नलीन कुमार कटील हे बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या प्रवासदौऱ्याच्या यादीत कर्नाटक राज्याध्यक्ष नलीन कुमार कटील हे दुपारी बेळगावमध्ये दाखल होणार असून दुपारी ३.३० दरम्यान हॉटेल संकम येथे हि बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उमेश कत्तीदेखील सहभागी होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या बैठकीत लोकसभा पोटनिवडणुकीच्या दृष्टिकोनातून तसेच इतर महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. उद्या होणाऱ्या या बैठकीत लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.