Saturday, December 21, 2024

/

यांच्या” प्रयत्नांमुळे लुबाडला गेलेला विदेशी पोहोचला आपल्या मायदेशी

 belgaum

बेंगलोर येथे लुबाडणूक झाली असल्यामुळे असहाय्य अवस्थेत बेळगांव शहरानजीकच्या बर्डे पेट्रोल पंपनजीक बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या नेपाळ देशातील एका इसमाला त्याच्या मायदेशी सुखरूप पोहोचविण्याची कामगिरी बेळगावचे कराटे व नृत्य प्रशिक्षक विनायक केसरकर यांनी बजावली आहे.

याबाबतची माहिती अशी की, बर्डे पेट्रोल पंप येथून जात असताना विनायक केसरकर याना दि. 31 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 2 च्या सुमारास रखरखत्या उन्हात पेट्रोल पंप जवळ एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत नजरेस आली. बेशुद्ध अवस्थेतील त्या व्यक्तीच्या आसपास दुर्गंधी पसरली होती. तेव्हा केसरकर यांनी पुढाकार घेऊन त्या व्यक्तीची शारीरिक स्वच्छता केली. त्या मूकबधिर व्यक्तीकडून विनायक केसरकर यांनी त्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

तेंव्हा त्याच्याकडे पिशवीत कांही महत्वाची कागदपत्रे होती. त्यावरून असे समजले की ती व्यक्ती नोकरी निमित्त बेंगळूर येथे आली होती तेथे कांही गुंडांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील पैसे वगैरे चोरले. यामध्ये महत्वाची कांही कागद पत्रे देखील चोरीला गेली होती.

या पद्धतीने लुबाडणूक झाल्यामुळे संबंधित व्यक्ती बेंगळूरहुन बेळगावपर्यंत चालत येऊन बर्डे पेट्रोल पंपनजीक बेशुद्ध होऊन पडली. त्यावेळी विनायक केसरकर यांनी दुपारी 4 च्या सुमारास काकती येथे एका खोलीत त्या व्यक्तीला आश्रय मिळवून दिला. त्यांच्याकडून त्याच्या मूळ गावाची व नावाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचे नांव बिकास थापा असे असल्याचे समजले. भारतातील सर्व शहरांची नांवे घेतल्यावर शेवटी काठमांडू या शहराचे नांव घेताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. विनायक केसरकर यांना नेपाळमधील कांही गावांची माहिती होती ती त्यांनी वदली तेंव्हा त्याने कांही इशारे केले.Youth help foreignour

पालिया, गौरिखंडा , धनगडी अशी नांवे घेतल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. आता खरी कसोटी होती ती त्याला नेपाळपर्यंत पोहचवण्याची. कांही लोकांच्या मदतीने भारतीय रेल्वेचे तिकीट भेटले. त्यांचा पाहुणचार करून 1 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी ठीक 8 वाजता गोवा एक्स्प्रेस या रेल्वेत बिकास थापा याला बसविण्यात आले.

ही रेल्वे 3 जानेवारी 2021 रोजी सकाळी पहाटे ठीक 6 वाजता दिल्ली येथे पोहचली. विनायक केसरकर हे कराटे आणि नृत्य शिक्षक असल्याकारणाने त्यांचे दिल्ली येथे काही शिष्य आहेत. त्यांनी तेथून त्या अनोळखी व्यक्तीसोबत स्वतः बसने प्रवास करत दि. 4 जानेवारी 2021 रोजी भारत आणि नेपाळ सीमेवर पोलिसांच्या हवाली केले. अशारितीने विदेशी पिडीताला मायदेशी पोहचविण्यात केसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले. या कार्यात विनायक केसरकर यांना गणेश थापा , चेतन डीगल, अनिस सौदागर, सुरेश ओखेडा, महेंद्र सिंग, शिवाजी कडोलकर , मदन भट व आशिष नेपाली यांनी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.