येत्या 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन कार्यक्रमासह 21 जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय आज बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
कॉलेज रोडवरील तालुका म. ए. समितीच्या कार्यालयामध्ये बेळगुंदी व हिंडलगा विभाग युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी सकाळी ही बैठक पार पडली. यावेळी बोलताना समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, सीमा लढ्यात 17 जानेवारी रोजी पहिले हुतात्मे बेळगावमध्ये झाले. तेंव्हा हुतात्मा दिनी प्रतिवर्षीप्रमाणे बेळगाव व कंग्राळी खुर्द येथे सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे.
त्याचप्रमाणे बेळगाव महापालिकेसमोर जो अनाधिकृत लाल-पिवळा ध्वज फडकविण्यात आला आहे, त्याच्या निषेधार्थ 21 जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये देखील सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे सांगून यासाठी तालुक्यातील विभागवार कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती करावी, असे आवाहन माजी आमदार किणेकर यांनी केले.
याप्रसंगी अनिल हेगडे, निंगाप्पा मोरे, कृष्णा हुंदरे, राजू किणयेकर, किरण मोहनकर, किणये विभागाचे अनिल पाटील, विनायक पाटील, मल्लाप्पा पाटील, उचगाव विभागाचे आर. आय. पाटील, अंकुश पाटील, महादेव हुंदरे, कंग्राळी बुद्रुक विभागाचे मयूर बसरीकट्टी, ॲड. सुधीर चव्हाण, मल्लाप्पा पाटील, हालगा विभागाचे मनोहर संताजी, सागर बिळगोजी, विठ्ठल पाटील, संतोष बांडगी, येळ्ळूर विभागाचे एल. आय. पाटील, शांताराम कुगजी, दूद्दाप्पा बागेवाडी, दत्ता उघाडे, सांबरा विभागाचे किरण पाटील, रोहित गोमाण्णाचे, सुधीर पाटील, काशिनाथ धर्मोजी, वसंत सुतार, वाघवडे विभागाचे आर. के. पाटील, ज्योतिबा आंबोळकर, सोमनाथ नाईक, महादेव बिर्जे, धामणे विभागाचे यल्लाप्पा रेमाण्णाचे, मनोहर जायण्णाचे, विजय बाळेकुंद्री, दशरथ येळ्ळूरकर आदी उपस्थित होते.