बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक जानेवारी -फेब्रुवारी 2019 मध्ये झाली असती परंतु माजी नगरसेवकांनी दावा दाखल केल्यामुळे ती लांबणीवर पडली. मात्र आता आज 2018 मधील मर्यादांच्या आधारावर 58 प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
बेळगाव महापालिकेची निवडणूक प्रलंबित असली तरी ती आता लवकरच होणार आहे. यासाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले असून आक्षेपासाठी 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
आजतागायत बेळगाव महापालिका निवडणूक कधीच पक्षपातळीवर झालेली नाही. महापालिका निवडणूक रिंगणात असणारे उमेदवार अपक्ष असायचे आणि निवडून आल्यानंतर त्यांचे मराठी, कन्नड आणि उर्दू भाषिक असे गट पडायचे. मात्र यावेळी भाजपने निर्णय घेतल्याप्रमाणे महापालिका निवडणुकीत पुढाकार घेतला तर हे चित्र मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत बेळगाव महापालिकेत मराठी किंवा कन्नड भाषिक उमेदवार महापौर आणि उपमहापौर झाले आहेत. त्याप्रमाणे आतापर्यंत भाजप, काँग्रेस, निधर्मी जनता दल आदी कोणत्याही राजकीय पक्षाने आपल्या अधिकृत पक्ष चिन्हावर बेळगाव महापालिकेची निवडणूक लढवलेली नाही. त्यांचे सर्व उमेदवारी अर्ज स्वतंत्र उमेदवार म्हणून भरले जात होते. बेळगाव महापालिकेची प्रभाग पुनर्रचना 2018 मध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार यावेळचे प्रभाग क्रमांक बदलणार आहेत.
मनपा निवडणुकीसाठी करण्यात आलेली आरक्षणाची रचना व्यवस्था पुढीलप्रमाणे
वॉर्ड क्र. 1- मागास अ महिला
वॉर्ड क्र. 2- सामान्य
वॉर्ड क्र. 3- मागास अ महिला
वॉर्ड क्र. 4- सामान्य
वॉर्ड क्र. 5- सामान्य महिला
वॉर्ड क्र. 6- मागास अ
वॉर्ड क्र. 7- मागास ब
वॉर्ड क्र. 8- सामान्य
वॉर्ड क्र. 9- मागास अ महिला
वॉर्ड क्र. 10 – मागास ब महिला
वॉर्ड क्र. 11- सामान्य
वॉर्ड क्र. 12- मागास अ
वॉर्ड क्र. 13- सामान्य महिला
वॉर्ड क्र. 14- मागास ब
वॉर्ड क्र. 15- मागास अ महिला
वॉर्ड क्र. 16- सामान्य
वॉर्ड क्र. 17- अनु. जाती महिला
वॉर्ड क्र. 18- सामान्य
वॉर्ड क्र. 19- मागास अ
वॉर्ड क्र. 20- सामान्य महिला
वॉर्ड क्र. 21- मागास अ महिला
वॉर्ड क्र. 22- सामान्य
वॉर्ड क्र. 23- सामान्य
वॉर्ड क्र. 24- मागास अ
वॉर्ड क्र. 25- सामान्य महिला
वॉर्ड क्र. 26- मागास अ महिला
वॉर्ड क्र. 27- सामान्य
वॉर्ड क्र. 28- अनु. जाती
वॉर्ड क्र. 29- सामान्य
वॉर्ड क्र. 30- मागास अ
वॉर्ड क्र. 31- मागास अ महिला
वॉर्ड क्र. 32- अनु. जाती
वॉर्ड क्र. 33- सामान्य महिला
वॉर्ड क्र. 34- सामान्य
वॉर्ड क्र. 35- अनु. जाती महिला
वॉर्ड क्र. 36- सामान्य
वॉर्ड क्र. 37- सामान्य महिला
वॉर्ड क्र. 38- मागास अ
वॉर्ड क्र. 39- सामान्य
वॉर्ड क्र. 40- मागास अ
वॉर्ड क्र. 41- सामान्य
वॉर्ड क्र. 42- मागास अ
वॉर्ड क्र. 43- सामान्य महिला
वॉर्ड क्र. 44- सामान्य
वॉर्ड क्र. 45- अनु. जमाती महिला
वॉर्ड क्र. 46- सामान्य
वॉर्ड क्र. 47- सामान्य महिला
वॉर्ड क्र. 48- मागास अ
वॉर्ड क्र. 49- सामान्य महिला
वॉर्ड क्र. 50- सामान्य महिला
वॉर्ड क्र. 51- अनु. जाती
वॉर्ड क्र. 52- सामान्य महिला
वॉर्ड क्र. 53- अनु. जमाती
वॉर्ड क्र. 54- सामान्य महिला
वॉर्ड क्र. 55- सामान्य महिला
वॉर्ड क्र. 56- सामान्य महिला
वॉर्ड क्र. 57- सामान्य महिला
वॉर्ड क्र. 58- सामान्य महिला
varad purnarche je kannad te marathit aal pahijet aamcha vard no mahit hohina