Monday, March 10, 2025

/

संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणजे शिवसेना-

 belgaum

 

 

शिवसेना बेळगाव सीमाभागतर्फे हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त बाळासाहेब यांना अभिवादन करण्यात आले.

शिवसेनेच्या शहरातील कार्यालयामध्ये आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना बेळगाव सीमाभागचे अध्यक्ष प्रकाश शिरोळकर होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, बाळासाहेब ठाकरे अमर रहे आदी घोषणा देण्यात आल्या.

यावेळी आपल्या समायोजित भाषणात मालोजीराव अष्टेकर यांनी ठाकरे घराण्याबद्दल माहिती दिली. ठाकरे घराण्याचा स्वातंत्र्य लढ्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मोठा सहभाग होता. प्रबोधनकार ठाकरे हे मोठे समाजसुधारक व तिखट लेखणी असणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा वारसा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे चालविला. विशेषतः संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर मुंबईत मराठी भाषिकांची परिस्थिती वाईट होणार की काय? असे वाटत असताना मुंबईतील मराठी माणसांना बळ देण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले हे नाकारता येत नाही. मुंबईत आज जो मराठीपणा दिसतो त्याचे मोठे श्रेय बाळासाहेबांना जाते. साहेबांनी मराठीपण जपण्याबरोबरच हिंदुत्व देखील जपले. बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकरांनी भारताला वेगळ्या तऱ्हेने हिंदुत्व शिकविले असे सांगून अन्यायाने कर्नाटकात डांबल्या गेलेल्या सीमाभागासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही, असे अष्टेकर यांनी सांगितले.Shivsena

याप्रसंगी शिवसेनेचे नेते अरविंद नागनुरी, पदाधिकारी राजकुमार बोकडे, रवींद्र जाधव, माजी महापौर आप्पासाहेब पुजारी आदींसह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

शिवसेनेमुळेच महाजन अहवाल गाडला गेला, नेताजी जाधव यांचे प्रतिपादन

बसवेश्‍वर सर्कल खासबाग येथील व्यापारी बंधु मंडळ व वायुपुत्र युवक मंडळातर्फे कै. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी सीमावाशीयांच्या मानगुटावर बसलेले महाजन अहवालाचे भुत शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनामुळेच गाडले गेले. अन्यथा सीमावाशीयांवर मोठा अन्याय झाला असता. बाळासाहेबानी नेहमीच मराठी भाषिकांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे त्यांचा वारसा अतिशय चांगल्या पध्दतीने चालवीत आहेत. सीमाप्रश्‍नाकडे त्यांनी सत्ता हाती घेतल्यापासुनच लक्ष दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सीमावाशीयांचे महाराष्ट्रात जाण्याचे स्वप्न पुर्ण होईल असा विश्‍वास आहे. असे मत व्यक्‍त केले.

युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, सागर पाटील आदींनी मनोगत व्यक्‍त केले. मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णा हलगेकर यांनी प्रास्तविक तर मिलिंद देसाई यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बाबु जाधव, सुभाष शिनोळकर, वासु सामजी, अनिल शिंदे, बंडु बामणे, रोहीत भाकोजी, राजु मेलगे, परशराम पाटील, रमेश शेठ, नितिन मेलगे, विजय जाधव, विजय हलगेकर, सुनिल गोरले, सतिश शिंदे, रोहीत भाकोजी, मितेश शिगेहळ्ळीकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.