उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच घडलेल्या या एका अंगणवाडी सेविकेच्या सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील आरोपीना तात्काळ गजाआड करून कडक शासन करावे, अशी मागणी शहर परिसरातील अंगणवाडी, एलकेजी आणि नर्सरी विभागाच्या शिक्षिकांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
बेळगाव शहर आणि परिसरातील अंगणवाडी एलकेजी आणि नर्सरी विभागाच्या शिक्षिकांनी आज सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
उत्तर प्रदेशातील अघैती (जि. बदायूं )येथे गेल्या रविवारी रात्री एका 50 वर्षीय अंगणवाडी सेविकेचा सामूहिक बलात्कार करून भीषण खून करणाऱ्या नराधमांना कडक शासन करावे आणि संबंधित अंगणवाडी सेविकेला न्याय मिळवून द्यावा. या मागणीसह जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये अंगणवाडी एलकेजी आणि नर्सरी विभागाच्या शिक्षिकांच्या पगार वाढीची मागणी देखील करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी संबंधित शिक्षिका मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात उपस्थित होत्या.