विमानतळावरील कर्मचाऱ्यांबाबत जारी करण्यात आलेले परिपत्रक मागे-कोविड नियंत्रणासाठी अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना ‘फ्रंटलाईन’ वर्कर्स’ म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यापैकीच विमानतळावरील कमर्चारीदेखील ‘फ्रंटलाईन’ वर्कर्स’ असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले होते.
परंतु पुन्हा एकदा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने नवे परिपत्रक जाहीर करण्यात आले असून विमानतळावरील कर्मचारी हे कोरोना फ्रंटलाईन सेवक नसल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
भारत सरकारच्या आदेशानुसार कर्नाटकातील विमानतळांवर असणारे कर्मचारी हे हेल्थकेअर वर्कर्स किंवा कोरोना काळातील फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून समाविष्ट केले जाणार होते.
परंतु हा आदेश मागे घेण्यात आला असून विमानतळांवर कार्यरत असणारे कर्मचारी हे कोविड १९ च्या लसीकरणाच्या समाविष्ट केले जातील, असे परिपत्रकात नमूद केले आहे.