उद्यमबागेतील “या” रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्याने उद्योजकात समाधान

0
6
Udhyambag road
 belgaum

उद्यमबाग येथील उत्सव हॉटेल समोरील 100 फुटी रस्त्याचे गेल्या कांही वर्षापासून प्रलंबित असलेले विकास काम आता सुरु झाल्यामुळे उद्योजकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

उत्सव हॉटेल समोरील 100 फुटी रस्ता हा उद्यमबागला जोडणारा लिंक रोड आहे. या रस्त्याचा विकास केला जावा अशी उद्यमबाग येथील उद्योजक आणि व्यावसायिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

यापूर्वी रवीकुमार हे बेळगांव महापालिकेचे आयुक्त असताना या रस्त्याच्या विकास कामास अनुमती मिळाली होती. परंतु अतिक्रमण, न्यायालयाचा हस्तक्षेप आदी कारणास्तव पुन्हा हे काम रेंगाळले होते.

 belgaum

Udhyambag road

सदर रस्त्याच्या विकास झाल्यास हा रस्ता उद्यमबाग येथील उद्योजकांसाठी मालाची ने-आण करण्यास अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्याचप्रमाणे हा रस्ता झाल्यास बेळगांव -खानापूर मुख्य हमरस्त्याऐवजी लिंक रोड ठरणाऱ्या या मार्गाने अवजड वाहने उद्यमबाग येथे ये -जा करू शकणार आहेत.

यासाठी सदर रस्त्याचे विकासकाम लवकरात लवकर पूर्ण केले जावे अशी मागणी सातत्याने केली जात होती. अखेर आता जेसीबी वगैरे वापरून या रस्त्याच्या विकास कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे उद्यमबाग येथील उद्योजक व व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.