ऑटोनगरात चाकूने भोसकून एका महिलेचा खून झाला आहे तिच्या पतीने हा खून केल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला आहे.
मार्केट ए सी पी सदाशिव कट्टीमनी आणि पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सखुबाई लमानी वय 32 रा. ऑटोनगर असे या मयत महिलेचे नाव आहे.तिच्या पतीने कोणत्या कारणासाठी हा खून केला याचा तपास पोलीस करत असून खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
जुने बेळगावात दोन दिवसांपूर्वी युवकाचा खून झाला होता त्यानंतर शुक्रवारी रात्री ऑटोनगरात महिलेचा खून झालाय गेल्या तीन दिवसांतला बेळगाव शहरातील हा दुसरा खून आहे