कर्नाटकातील लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी इच्छुकांनी मात्र आतापासूनच राज्यात निवडणुकीचे माहोल तयार केले आहे. बेळगावमधील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी देशाच्या राजकारणापेक्षाही जोरदार रस्सीखेच सुरु असून सर्वच राष्ट्रीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची नावे दिवसागणिक वाढतच चालली आहेत. काँग्रेसच्या वतीने बेळगावमधील दोन मातब्बर नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत, आणि त्यांची नावे हायकमांडकडे सुचविण्यात आली आहेत. शिवाय अधिकृत उमेदवाराच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे अशी माहिती केपीसीसी अध्यक्ष शिवकुमार यांनी दिली. बेळगावमध्ये एक आमदारांच्या यांच्या भाच्याच्या लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या शिवकुमारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
यादरम्यान केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे नाव उमेदवारीसाठी ऐकण्यात आले नाही, शिवाय सतीश जारकीहोळी हे राज्यातील प्रभावी नेते असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु काँग्रेसच्यावतीने सतीश जारकीहोळी यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत असल्याबाबत त्यांनी कोणतीही स्पष्टोक्ती दिली नाही.
सी. एम. इब्राहिम यांची भेट अचानक घेतल्याप्रकरणी प्रत्रकारांनी याबाबत स्पष्टीकरण विचारले असता, सी. एम. इब्राहिम यांना काँग्रेसने दोनवेळा विधान परिषदेचे सदस्यत्व दिले असून सी. एम. इब्राहिम यांनी सहजच प्रभाकर कोरे यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
विमानतळावरून विविध ठिकाणी आपण जात होतो, यादरम्यान सहज आपली भेट झाली असल्याचे डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.