Sunday, November 24, 2024

/

1 कोटी कर्ज आणि 300 म्हशी शेतकऱ्यांना करणार वितरण

 belgaum

माधवपूर -वडगांव कृषी पत्तीन सहकारी संघातर्फे आगामी वर्षासाठी शेतकऱ्यांना 1 कोटी रुपयांचे बिनव्याजी शेती अर्थात कृषी कर्ज आणि 300 म्हशींचे वितरण केले जाणार असून गरजू शेतकरी बांधवांनी याचा त्वरेने लाभ घ्यावा, असे आवाहन माधवपूर -वडगांव कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन अमोल देसाई यांनी केले आहे.

माधवपूर -वडगांव कृषी पत्तीन सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण बैठक आज बुधवारी पार पडली. सदर बैठकीत शेतकऱ्यांना शेतीसाठी बिनव्याजी कर्ज वितरित करण्याच्या विषयासह शेतकऱ्यांसाठी हितकारक योजना राबवण्यास संदर्भात चर्चा करण्यात आली. चेअरमन अमोल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस व्हा. चेअरमन आप्पाजी हलगेकर, संचालक गंगाधर बिर्जे, रघुनाथ जुवेकर, तानाजी भोसले, शशिकांत पाटील, श्रीमती वर्षा आजरेकर, संतोष शिवणगेकर आणि गुरुराज शहापूरकर यांच्यासह संघाचे सेक्रेटरी मल्लिकार्जुन हेबळ्ळी उपस्थित होत.Vadgav krushi pattin

सदर बैठकीनंतर बेळगांव लाईव्हशी बोलताना चेअरमन अमोल देसाई यांनी वरील प्रमाणे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, बेळगांव मध्यवर्ती सहकारी बँकेने (डीसीसी) आम्हाला 1 कोटी रुपयांचे बिनव्याजी कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्याचप्रमाणे पशुपालनासाठी 300 म्हशी शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी दिल्या जाणार आहेत. डीसीसी बँकेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या शेतीसाठीच्या बिनव्याजी कृषी कर्जपुरवठाचा लाभ घेण्यास ज्या सभासदांच्या नांवावर शेती आहे असेच शेतकरी पात्र असतील.

तसेच त्यांची शेतजमीन बेळगांव जिल्ह्यात कोठेही असली तरी चालणार आहे. शेतीसाठी बिनव्याजी कर्ज मिळवण्यासाठी इच्छुकांनी येत्या 31 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज करावयाचे आहेत. या अर्जासोबत शेतकऱ्यांनी स्वतःचे 8 फोटो, पॅन कार्ड (3), आधार कार्ड (3), रेशन कार्ड (1), जमिनीचा नवीन उतारा (2) आणि वारसदार आधार कार्ड (1) यांच्या कंसात दिलेल्याप्रमाणे झेरॉक्स प्रति जोडलेल्या असाव्यात, असे अमोल देसाई यांनी स्पष्ट केले.

राज्य सरकारकडून डीसीसी बँकेच्या माध्यमातून कृषी पत्तीन संस्थांना कर्ज पुरवठा केला जातो. पूर्वी एकरी 25 हजार रु. बिनव्याजी कृषी कर्ज दिले जात होते. मात्र आता या कर्जाची रक्कम 40 हजार रु. करण्यात आली आहे. बेळगांव शहरात अनगोळ, कॅन्टोन्मेंट आणि वडगांव अशा तीन ठिकाणी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ आहेत. मात्र यापैकी सध्या माधवपूर -वडगांव येथील एकमेव कृषि पत्तीन सहकारी संघ समर्थपणे कार्यरत आहे, अशी माहिती देखील देसाई यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.