नेहरूनगर येथील एक किराणा मालाचे दुकान फोडून चोरट्यांनी 12 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली.
नेहरूनगर येथील प्रकाश किराणा स्टोअर्स हे दुकान काल मध्यरात्री फोडून चोरट्यांनी दुकानातील 12 हजार रुपयांची रोकड लंपास केली.
चोरटे माहीतगार असावेत असा कयास आहे कारण त्यांनी किराणा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप न तोडता शेजारी असलेल्या चौकटीचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करण्याद्वारे आपला कार्यभाग साधला.
सदर चोरीच्या घटनेची एपीएमसी पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.