दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होणार असून राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे.आगामी 1 जानेवारी पासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत.
मुख्यमंत्री बी एस येडीयुरापा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे या याशिवाय सहावी ते नववी पर्यन्तच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यागम’ हा कार्यक्रम होणार आहे.
गृह मंत्र्याच्या कार्यालयात शाळा सुरू कराव्या की नाहीत याबाबत मुख्यमंत्र्यांनी शनिवारी बैठक घेतली त्या बैठकित 1 जानेवारी पासून 10 आणि 12 वी चे वर्ग सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 15 दिवस क्लास कसे चालतात हे पाहून उरलेले पुढील वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
मार्च मध्ये झालेल्या लॉक डाऊन नंतर राज्यातील सर्व शाळा बंद आहेत जवळपास 10 महिन्याच्या कालावधी नंतर 10 आणि 12 क्लास भरणार आहेत.
हे आहे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांचे ट्विट
ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವರು, ಕೋವಿಡ್19 ತಾಂತ್ರಿಕ ಸಲಹಾ ಸಮಿತಿಯೊಂದಿಗೆ ಇಂದು ವಿಸ್ತೃತವಾಗಿ ಚರ್ಚಿಸಿ, 2021ರ ಜನವರಿ 1 ರಿಂದ, 10ನೇ ತರಗತಿ ಮತ್ತು ದ್ವಿತೀಯ ಪಿಯುಸಿ ತರಗತಿ ಹಾಗೂ 6 ರಿಂದ 9ನೇ ತರಗತಿಗೆ ವಿದ್ಯಾಗಮ ಪ್ರಾರಂಭಿಸಲು ತೀರ್ಮಾನಿಸಲಾಗಿದೆ. 15 ದಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅವಲೋಕಿಸಿ ಇತರ ತರಗತಿ ಪ್ರಾರಂಭಿಸುವ ಕುರಿತು ನಿರ್ಧರಿಸಲಾಗುವುದು.
— B.S. Yediyurappa (@BSYBJP) December 19, 2020