एसएसएलसी आणि पदवीपूर्व (पीयूसी) द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी घेतला आहे. मात्र या निर्णयावर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शिक्कामोर्तब केले जाईल, असे म्हंटले आहे
बेंगलोर विधानसभा येथे आज बुधवारी झालेल्या बैठकीत खाजगी शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालयांच्या व्यवस्थापन प्रतिनिधींना संबोधताना मंत्री एस. सुरेश कुमार यांनी उपरोक्त माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या शिक्षणाची नोंद लक्षात घेऊन या मुद्द्यावर लक्ष देण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत आणखी एक बैठक आयोजित केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. यापूर्वी कोरोना तांत्रिक सल्लागार समितीने केलेल्या शिफारशींना मान्यता देऊन सरकारने डिसेंबरमध्ये शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालयं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.