बेळगावमध्ये आयोजित शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बैठकीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना महत्वपूर्ण संदेश दिला. विशाळगड आणि पन्हाळगड मोहिमेसंदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांना भिडे गुरुजींनी मार्गदर्शन केले.
हिंदवी स्वराज्य खडा पहारा संदर्भात नावनोंदणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या उपक्रमांतर्गत आजपर्यंत तालुक्यातील जवळपास ३५०० कार्यकर्त्यांनी नावनोंदणी केली आहे. या नावनोंदणीसंदर्भातही त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलताना म्हणाले कि, छत्रपती शिवरायांबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आदर आणि प्रेम आहे. परंतु शिवाजी महाराजांबद्दल केवळ आदर आणि प्रेम न बाळगता, त्यांचे पाईक न होता त्यांच्याप्रती आपण निष्ठा अर्पण केली पाहिजे.
बेळगावमधील समस्त मराठी जनतेची महाराष्ट्रात जाण्याची जी इच्छा आहे तीच इच्छा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचीही आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीप्रमाणे कार्यरत रहावे, आणि
बेळगावमध्ये आयोजित शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बैठकीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना महत्वपूर्ण संदेश दिला. विशाळगड आणि पन्हाळगड मोहिमेसंदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांना भिडे गुरुजींनी मार्गदर्शन केले.
हिंदवी स्वराज्य खडा पहारा संदर्भात नावनोंदणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या उपक्रमांतर्गत आजपर्यंत तालुक्यातील जवळपास ३५०० कार्यकर्त्यांनी नावनोंदणी केली आहे. या नावनोंदणीसंदर्भातही त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलताना म्हणाले कि, छत्रपती शिवरायांबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आदर आणि प्रेम आहे.
परंतु शिवाजी महाराजांबद्दल केवळ आदर आणि प्रेम न बाळगता, त्यांचे पाईक न होता त्यांच्याप्रती आपण निष्ठा अर्पण केली पाहिजे. बेळगावमधील समस्त मराठी जनतेची महाराष्ट्रात जाण्याची जी इच्छा आहे तीच इच्छा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचीही आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीप्रमाणे कार्यरत रहावे, आणि सीमाप्रश्नाशी निष्ठा ठेऊन कार्यरत राहावे असे आवाहनही भिडे गुरुजींनी केले.