राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे परिणामी बेळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सात तालुक्यांचा निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत तर दुसर्या टप्प्यात सात तालुक्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत पहिल्या टप्प्यात बेळगाव इतर सात तालुक्यांचा समावेश करण्यात झाला असून आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी नुकतीच एक पत्रक काढले आहे.
रविवार दिनांक 20 रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून या सात तालुक्यात 144 कलम लागू करण्यात आला आहे त्यामुळे यापुढे प्रचारात केवळ पाच माणसांचा समावेश असणार आहे त्यामुळे यापुढे हा नियम मोडणार्या वर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे याच बरोबर आचारसंहिता भंग प्रकरणी वेगवेगळे नियम आणि अटी लागू करण्यात आले आहेत त्यामुळे यापुढे जर कोणत्याही नियमांचा भंग करून मनमानी कारभार केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे .
हा नियम दिनांक 22 डिसेंबरच्या मध्यरात्री पर्यंत असणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे आहे त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रकारे आचारसंहिता भंग आणि 144 कलम नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी सांगितले आहे .
दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील मतदान 27 डिसेंबर रोजी होणार असून दिनांक 25 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून संबंधित तालुक्यात हा नियम लागू होणार आहे त्यामुळे याकडे नागरिकांनी गांभीर्याने विचार करून नियमांचे पालन करावेत असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
कोणत्याही प्रकारे अनुचित घटना घडू नये ये तलवार चाकू बंदूक किंवा इतर घातक शस्त्रे बाळगण्यावर मनाई करण्यात आली आहे हे त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 144 कलम लागू असणार आहे यापुढे असे कोण केल्यास अंतर्गत कारवाई होणार असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे एका पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे त्यामुळे यापुढेही कोणत्याही ग्रामपंचायत हद्दीत नियमांचे उल्लंघन केल्यास त्याची गैर करण्यात येणार नाही असेही इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.