*समर्थ सोसायटी ची गरुडभरारी*
येथील समर्थ अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीने नुकतेच रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे त्यानिमित्त या सोसायटीच्या प्रगतीचा आढावा घेणारा हा लेख………………….
बेळगाव शहर ही सर्व भाषेच्या आणि जातीच्या लोकांचे आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही .या शहरात सुरुवातीला पायोनियर अर्बन बँकेसारखी एखादीच संस्था सर्व भाषिकांची होती पण त्यानंतर मराठ्यांची मराठा सहकारी बँक ,लिंगायतांची बसवेश्वर बँक, जैन समाजाची महावीर बँक, मुस्लिम समाजाची मुस्लिम को-ऑपरेटिव बँक अशा बँका उदयास आल्या. पण बुद्धिमान असूनही संख्येने कमी असलेल्या ब्राह्मण समाजाची मात्र सहकारी संस्था नव्हती .अशावेळी ब्राह्मण समाजाचे एक अखिल भारतीय संमेलन महावीर भगवान बेळगाव येथे झाले यावेळी ब्राह्मण समाजाची एक सहकारी संस्था बेळगावात होण्याची गरज उपस्थितांनी प्रतिपादन केली त्यानंतर समाजातील काही धूरीणांनी एकत्र येऊन स्वामी समर्थ रामदासांच्या आठवणीप्रित्यर्थ समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ची स्थापना दि.25-11-1996 रोजी केली. समाजातील अनेक जण या संस्थेचे सभासद झाले. काँग्रेस रोडवर भाडोत्री जागेत सुरू झालेल्या या संस्थेला समाजातील काही व्यक्तींनी टेबल-खुर्च्या व कपाटे दान दिली आणि संस्था मूळ धरू लागली
संस्थेचा व्याप वाढू लागल्यानंतर कडोलकर गल्लीत पहिल्या मजल्यावर जागा घेऊन तेथे समर्थ ची सुरुवात करण्यात आली. कालांतराने कडोलकर गल्लीत जागा कमी पडू लागल्याने नवीन जागेचा शोध सुरू झाला याच कालावधीत चन्नम्मानगर शाखेसाठी स्वतःची जागा घेण्यात आली
26 फेब्रुवारी 2014 रोजी निवडून आलेल्या संचालक मंडळाने संस्थेच्या विकासाचा ध्यास घेऊन काम केले त्यामुळे संस्था दिवसेंदिवस प्रगती करू लागली .दरम्यान जोशी कुटुंबियांच्या मालकीची मारुती गल्लीतील जागा खरेदी करून तेथे मुख्य कार्यालयाची सुरुवात करण्यात आली .संचालक मंडळाने घेतलेल्या कडक धोरणामुळे संस्था प्रगती करू लागली
चेअरमन पंढरीनाथ कुलकर्णी यांच्या कारकिर्दीत विशेष ठेव योजना राबविल्याने संस्थेकडे बऱ्याच ठेवी जमा झाल्या.
आज संस्थेने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे संस्थेकडे 125 कोटीच्या ठेवी, 106 कोटीची कर्जे आणि वार्षिक उलाढाल 500 कोटीच्या आसपास झालेली आहे. ही सगळी प्रगती एन डी जोशी यांच्यासारख्या धाडसी नेतृत्वाच्या निर्णयामुळे झाली असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही .गेल्या सात-आठ वर्षात संस्थेने जी गरुड झेप घेतली त्याबाबत बोलताना चेअरमन एन डी जोशी म्हणतात की ‘योग्य ते तारण ठेवून घेऊन कर्जे वितरित केली त्याचबरोबर कर्जाच्या वसुलीसाठी तितक्याच जबाबदारीने आणि सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करून वसुली सुद्धा केली त्यामुळेच संस्था स्थिर होऊ शकली.
बेळगाव शहरातील हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या काही संस्थांनी गैरव्यवहार केल्याने गेल्या काही वर्षात सहकार क्षेत्र अडचणीत झाले असले तरीही समर्थच्या संचालक मंडळातील एकजूट , कर्मचारी वर्गाची कार्यतत्परता या सर्व गोष्टीमुळे संस्था प्रगती करीत आहे. नागरिकांनी विश्वास ठेवून या संस्थेत मोठ्या ठेवी ठेवल्या आहेत. रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पंचवीस दिवसातील ठेवीच्या कार्यक्रमास मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता समर्थ सोसायटीच्या संचालकांवर जनतेने दाखवलेल्या विश्वासाची पोचपावती मिळते. केवळ नफा मिळवणे एवढाच आमचा उद्देश नाही तर सामाजिक बांधिलकी जपत सभासदांचे हित अबाधित राखणे यासाठी आम्ही ही बांधील आहोत अशी प्रांजळ कबुली ते देतात.
सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव करीत असतानाच यावर्षीही सहकार खात्याकडून आयोजित करण्यात आलेल्या तीस आशा कार्यकर्त्यांचा ज्यांनी covid-19 च्या काळात खूप आरोग्यविषयक काम केले तयांचा सत्कार करण्यात आला तसेच एप्रिल आणि मे महिन्यात सोसायटीच्या मुख्य कार्यालयातून मदत मागण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना मग ती सभासद असो वा नसो प्रत्येकी पाच किलो तांदूळ ,आटा, एक किलो तेल, तूरडाळ व बेसन अशा किटचे वाटप केले ज्याचा सुमारे 300 कुटुंबांनी लाभ घेतला.
गेली सहा वर्षे सलग 17 टक्के डिव्हीडंट संस्था देत असून यंदाही त्याच प्रमाणात डिव्हिडंट देण्याचा संस्थेचा मानस आहे.
*अनेक मानाचे पुरस्कार*
संस्थेला 2016- 17 ला उत्कृष्ट सोसायटी पुरस्कार ,कर्नाटक रत्न राज्य पुरस्कार व भारत गौरव हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे .यावर्षी सिरी कन्नड संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन समर्थ ला गौरविण्यात आले आहे.
*समर्थ च्या सर्व शाखा स्वतःच्या जागेत*
समर्थ सोसायटीच्या मारुती गल्लीतील मुख्य शाखा, शहापूर शाखा, चनमानगर शाखा या सर्व स्वतःच्या इमारतीत आहेत फक्त टिळकवाडी शाखा भाडोत्री जागेत होती गेल्या वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केल्याप्रमाणे आता तीही शाखा लवकरच स्वतःच्या जागेत स्थलांतरित केली जाणार आहे त्यासाठी मंगळवार पेठ येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या तळमजल्यावरील जागा समर्थ सोसायटीने नोंद केली आहे .त्याच्या कामकाजास सुरुवात नुकतीच सुरुवात झाली आहे .संस्थेच्या सर्व शाखा स्ट्रॉंग रूम व सेफ डिपॉझिट लाॅकरसह सुसज्ज असून नजीकच्या कालावधीत विविध उपक्रम राबविण्याबरोबरच काही योजना ही आखण्यात येणार आहेत अशी माहिती जोशी यांनी दिली