मनपा कार्यालया समोर कन्नड संघटनांनी बसवलेल्या अनधिकृत लाल पिवळा ध्वज हटवा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तर्फे उद्या मंगळवारी बेळगाव पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.
महानगर पालिका बेळगाव याठिकाणी काहीनी लाल पिवळा अनधिकृत झेंडा फडकवत बेळगावचे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला आहे आणि भारतीय ध्वज संहितेच्या विरुद्ध हा झेंडा तिरंग्याच्या समोर फडकला गेला आहे त्यामुळे भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान होत आहे.
तरी सदर अनधिकृत झेंडा हटवून बेळगावचे वातावरण गढूळ करणाऱ्या समाजकंटाकवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी युवा समितीच्या मार्फत पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.
युवा समिती पदाधिकार्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि देशभक्त सुजाण नागरिकांनी मंगळवार दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता पोलीस आयुक्तालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीनं करण्यात आले आहे.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1293531181004472/
https://www.facebook.com/375504746140458/posts/1293529947671262/