राजकारणी म्हटलं की कोणत्याही नियमांचे पालन करणारे अपवादच. बेळगावमध्येही आज अशाच एका गोष्टीची प्रचिती आली. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्याबाबतीत अशाच एका गोष्टीवरून आज पत्रकारांनी त्यांच्यावर एका कार्यक्रमात बहिष्कार घालण्याचे ठरविले.
निमित्त होते भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेचे. वेळेवर न आलेल्या राज्यसभा सदस्यांवर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली.
सहसा पत्रकार म्हटलं की हातात माईक घेऊन कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या किंवा सिलिब्रिटीच्या मागे मागे धावून प्रश्न विचारणे, हा एकच समज प्रत्येकाचा झाला आहे. परंतु प्रत्येक पत्रकार हा याचसाठी नसतो. पत्रकारही दिवसभरच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी कधी या ठिकाणी तर कधी त्या ठिकाणी … शहर, परिसर, आणि अगदी तालुक्यातही सवडीने आणि तितक्याच शिताफीने कार्यक्रमस्थळी, घटनास्थळी बातमी घेण्यासाठी आणि ती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी धडपड करत असतो. परंतु बहुतेक वेळा राजकारणी आणि प्रतिष्ठित व्यक्तींमुळे कितीतरी वेळ ताटकळत उभं राहावं लागतं.
पत्रकारांनाही ‘बिझी शेड्युल’चा सामना करावा लागतो, याचे भान कोणालाही कधीही नसते. परंतु आज १०.०० चा वेळ असूनही १०.४५ नंतरही इराण्णा कडाडी कार्यक्रमस्थळी पोहोचले नसल्यामुळे पत्रकार चांगलेच संतापले आणि कडाडी यांच्यावर आज बहिष्कार घालण्याचे ठरविले.
त्यानंतर कार्यक्रमस्थळी १०.४५ च्या दरम्यान इराण्णा कडाडी यांचे आगमन होताच पत्रकारांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. आणि त्यांच्या या कर्तव्याबाबतही त्यांना आठवण करून दिली. आणि यानंतर चक्क राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी पत्रकारांची माफी मागितली. त्यानंतर नरमलेल्या पत्रकारांनी इराण्णा कडाडी यांना पत्रकार परिषदेत सहभाग घेतला.