अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराप्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात कलम ३५४ अन्वये डी ५०४, ५०६, सहकलम आयपीसी ३४ आणि कलम १२ या पॉक्सो कायद्यांतर्गत न्यायालयाने आरोपीना ३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
६ फेब्रुवारी २०१६ रोजी संबंधित आरोपीने अल्पवयीन मुलीला अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करून धमकी दिली होती. त्यानंतर संबंधित मुलीच्या घरी जाऊन तिला झोपेच्या गोळ्या देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणात तिघांचा समावेश होता. याप्रकरणी अन्वेषक एम. बी. कांबळे यांनी ३रे अधिक आणि सत्र न्यायालयात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
न्यायाधीश मंजप्पा अन्नय्यनवर यांनी प्रकरणात १० जणांच्या साक्षी नोंदवून तसेच दहा विविध पुराव्यांच्या आधारे या प्रकरणातील आरोपी १) तौसिफ़ इब्राहिम बेपारी (वय २४, रा. काकर स्ट्रीट, कॅम्प), २) वर्ष (वय २१, रा. काकर स्ट्रीट, कॅम्प) आणि ३) जाहीर शकीलअहमद शेख (वय २१, रा. मार्केट स्ट्रीट कॅम्प) या तिघांना ३ वर्षांची शिक्षा आणि एकूण ४३५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापैकी ४०००० हजार रुपये अत्याचारग्रस्त मुलीला देण्यात येणार आहेत. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराप्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात कलम ३५४ अन्वये डी ५०४, ५०६, सहकलम आयपीसी ३४ आणि कलम १२ या पॉक्सो कायद्यांतर्गत न्यायालयाने आरोपीना ३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
६ फेब्रुवारी २०१६ रोजी संबंधित आरोपीने अल्पवयीन मुलीला अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करून धमकी दिली होती. त्यानंतर संबंधित मुलीच्या घरी जाऊन तिला झोपेच्या गोळ्या देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणात तिघांचा समावेश होता. याप्रकरणी अन्वेषक एम. बी. कांबळे यांनी ३रे अधिक आणि सत्र न्यायालयात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. न्यायाधीश मंजप्पा अन्नय्यनवर यांनी प्रकरणात १० जणांच्या साक्षी नोंदवून तसेच दहा विविध पुराव्यांच्या आधारे या प्रकरणातील आरोपी १) तौसिफ़ इब्राहिम बेपारी (वय २४, रा. काकर स्ट्रीट, कॅम्प), २) वर्ष (वय २१, रा. काकर स्ट्रीट, कॅम्प) आणि ३) जाहीर शकीलअहमद शेख (वय २१, रा. मार्केट स्ट्रीट कॅम्प) या तिघांना ३ वर्षांची शिक्षा आणि एकूण ४३५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापैकी ४०००० हजार रुपये अत्याचारग्रस्त मुलीला देण्यात येणार आहेत. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.