काकती पोलीस स्थानकात दाखल असलेल्या तक्रार क्रमांक ३८/२०१७ यावर न्यायालयाने संबंधित आरोपींवर भादंवि. कलम १४३, १४७, १४८, ३४१, ३५४, ३७(डी), ३८५, ३९४, ५०४, ५०६, आयपीसी सहकलम १४९ आणि पॉक्सो कायदा कलम ४, ६, १२, पीआय कलम 67 अंतर्गत दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणातील आरोपी क्रमांक १) संजू सिद्धाप्पा दड्डी (रा. मुत्यानट्टी) २) सुरेश भरमाप्पा बेळगावी (रा. मुत्यानट्टी) ३) सुनील लगमाण्णा राजकट्टी (मुत्यानट्टी) ४) महेश बाळाप्पा शिवनगोळ (मणगुत्ती) ५) सोमशेखर दुरदुन्डेश्वर शहापूर (रा. मुत्यानट्टी) ६) आकाश मांगनूर (रा. मांगनूर) अशा सहा जणांवर अन्वेषक पीआय रमेश गोकाक यांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार बेळगावच्या तिसऱ्या वरिष्ठ सत्र न्यायालयाने या सहापैकी आरोपी क्रमांक १ आणि २ यांना ५२१००० रुपये दंड आणि जन्मठेप , आरोपी क्रमांक ३ याला ५११००० रुपये दंड आणि जन्मठेप तसेच आरोपी क्रमांक ४ आणि ५ यांना ५०६००० रुपये दंड आणि जन्मठेपेची शिक्ष सुनावली आहे.
या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी कामकाज पाहिले. संबंधित आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी पाटील यांनी बाजू मांडली होती.
पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपींना दंडासहित कठोर शिक्षा
कॅम्प पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रार क्रमांक ३३/२०१६ यावर भादंवि कलम ३४१, ३५४ (डी) आणि पॉक्सो कायदा कलम १२ अंतर्गत आरोपींना कठोर शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी १) तौसिफ़ इब्राहिम बेपारी (कॅम्प) २) महम्मद ताहीर इब्राहिम बेपारी (कॅम्प) ३) जाहिद शकील अहमद शेख (कॅम्प) या तीन आरोपींवर तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार अन्वेषक पीएसआय एम . बी. कांबळे यांनी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्राची सुनावणी ३ रे वरिष्ठ आणि जिल्हा सत्र न्यायालयाने केली आहे. साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे संबंधित आरोपींना ३ वर्षाची कठोर शिक्षा आणि ४४,५०० रुपये दंड ठोठावला आहे.
या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी कामकाज पाहिले. संबंधित आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी पाटील यांनी बाजू मांडली होती.