Monday, January 13, 2025

/

महिलांना विमानतळावर नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार उघडकीस

 belgaum

सध्या संपूर्ण देशात ‘इन्स्टंट’ पैसे कमविण्याचा फंडा अनेकजण अवलंबत असून लोकांना थकवून पैसे लुबाडण्याचा प्रकार फोफावत चालला आहे. बेळगावमधील एक विवाहित तरुणी अशाच एका आमिषाला फसली असून हजारो रुपयांची मागणी करून विमानतळावर नोकरी देण्याचे आमिष या विवाहितेला दाखविण्यात आले आहे.

‘इंडिगो’ या विमान कंपनीच्या नावाखाली दिल्लीतील एका बोगस कंपनीने ऑनलाईन आपले सावज हेरून त्यांना आपला मोबाईल क्रमांक विचारून हा प्रकार केला आहे. संबंधित महिलेच्या मोबाईलवर आपल्याला नोकरी मिळाल्याचे सांगत काही ऑनलाईन लिंक्स फॉरवर्ड केल्या आहेत. काही बनावट फॉर्म्स पाठवून ते फॉर्म आपल्याला मिळाल्याचे सांगत या लिंक्सच्या माध्यमातून केवळ एका ऑनलाईन प्रवेश परीक्षा देण्याचे सांगून या परीक्षेसाठी २५००/- रुपये शुल्क आकारण्यात आले. त्यानंतर निवड झाल्याचा मेल या महिलेच्या मेल आयडीवर पाठवून ‘सांबरा विमानतळावर ग्राउंड स्टाफ’ साठी आपली निवड झाली असून या सर्व प्रक्रियेसाठी पुन्हा ७०००/- रुपयांची मागणी करण्यात आली.

या सर्व प्रकाराचा विवाहितेच्या पतीला संशय येताच ‘इंडिगो’ कंपनीला त्याने फोन लावायला सुरुवात केली. व्हाट्सएपच्या माध्यमातून संपर्क साधण्याचं प्रयत्न केला. परंतु ‘सिस्टम बेस्ड’ मॅसेज प्रक्रियेमुळे विवाहितेच्या मोबाईलमधील सर्व मॅसेजीस या कंपनीने डिलीट केले. यानंतर सातत्याने या कंपनीला संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्या कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत संबंधित जोडप्याने पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचे ठरविले आहे.

Online froud

लॉकडाऊन नंतर अनेकजण आपल्या उदरनिर्वाहासाठी झटत आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या आर्थिक स्रोतासाठी धडपड करत आहे. अशातच वेगवेगळ्या गोष्टींचे आमिष दाखवून गंडवण्याचे प्रकारही वाढीस आले आहेत. विशेषतः महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून विविध प्रकारचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. डिजिटलायझेशनमुळे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आर्थिक व्यवहार सुलभरीत्या सुरु आहेत. डिजिटलायझेशनचा जितका फायदा आहे तितकाच किंवा त्यापेक्षा अधिक याचा धोका आहे. यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगून, कोणत्याही आमिषाला बळी न पडता, प्रत्येक गोष्टीची पडताळणी करूनच आपले पाऊल पुढे टाकणे, हि काळाची गरज बनली आहे.

बेळगाव विमान तळाचे संचालक राजेश कुमार मौर्य यांनी विमान तळ प्राधिकरण आणि कोणतीही एअरलाईन्स कंपनी नोकरीसाठी पैश्याची मागणी करत नाही त्यामुळे तरुण तरुणींनी ऑनलाइन फ्रॉडला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.