Thursday, January 23, 2025

/

चोवीस तासाच्या आत सुटला जुनेबेळगाव खुनाचा तिढा

 belgaum

शहापूर पोलिसांनी केवळ चोवीस तासाच्या जुने बेळगाव येथील खुनाचा तपास करत आरोपीना गजाआड केले आहे. ईर्ष्या आणि पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे डी सी पी विक्रम आमटे यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.बुधवारी रात्री तीक्ष्ण हत्याराने भोसकून जयपाल गुराने वय 35 या जुने बेळगाव येथील युवकाचा निर्घृण खून करण्यात आला होता.मयत जयपाल आणि आरोपींचे सहा वर्षा पासून जुने भांडण होते त्या भांडणातून राग ठेऊन आरोपींनी जुने बेळगाव येथे रॉड तलवारीने हल्ला करत खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

जोतिराज सिद्राय दोडमनी वय 25 रा.जूने बेळगाव, अक्षय कृष्णा कोलकार वय 24,प्रशांत यल्लप्पा कळलीमनी वय 24,प्रताप बसवंत गराणी वय 28,रोहित राजेंद्र दोडमनी वय 23,शिवराज नागेश दोडमनी वय 24 रा. सर्वजन जुने बेळगाव अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.Shahapur ps

जयपाल हा पूर्वी ड्रायव्हरचे काम करत होता आता तो रिकामी होता जुने बेळगाव येथील लक्ष्मी तालीमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत त्याचा मृतदेह सापडला होता. शहापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत केवळ चोवीस तासांत खून प्रकरणाचा उलगडा केला आहे.

बुधवारी जुने बेळगाव भागांत एका विवाह सोहळ्यात आरोपी आणि मयतांच्यात भांडण झाले होते त्यानंतर बुधवारी रात्रीच आरोपींनी जयपाल वर तलवार आणि रॉडने हल्ला केला.
डी सी पी आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलिसांनी तपास पथक नेमुन एका दिवसांत या खुनाचा तपास केलेल्या पोलिसांचे पोलीस आयुक्तांनी अभिनंदन केले आहे.

https://www.facebook.com/livebelgaum/videos/221351399499754/

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.