कडोली मतदार संघाच्या कार्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घोळ सुरू झाला आहे. अनेक मतदारांचे नाव यादीत नसल्यामुळे मोठी पंचाईत झाली असून तब्बल 120 अधिक जणांचे मतदान या वेळी होणार नसल्याची चिन्हे दिसून आले आहे.
सरकारच्या सावळ्या गोंधळामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत असून मतदान करायचे तरी कसे असा प्रश्न मतदारांतून विचारला जाऊ लागला आहे. कडोली गावात वार्ड क्रमांक तीन आणि इतर वार्डात हा घोळ सुरू झाला आहे.
मोठ्या प्रमाणात अनेकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम झाले आहे. हा सारा घोळ नेमका कुणामुळे झाला आणि कशामुळे झाला याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.
160 हून अधिक मतदारांची नावे यादीत नसल्यामुळे मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी जर हे मतदार मतदान करणार नसतील तर या वॉर्डाची निवडणूक पुन्हा एकदा घ्यावी अशी मागणीही मतदारांनी व्यक्त केली आहे.
मागील आठवडाभरापासून हा घोळ सुरू आहे. दुसऱ्या वार्डात तरी आपले मतदान येईल या आशेवर नागरिक होते. मात्र त्यांची घोर निराशा झाली आहे. याचा फटका मतदारांना बसला असून उमेदवारांनाही याची झळ पोहोचणार यात शंका नाही.
त्यामुळे इच्छुकांनी ही याबाबत आवाज उठविण्याची गरज निर्माण झाले असून तातडीने याबाबत पुन्हा एकदा निवडणूक घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर काहीजण धारवाड येथील उच्च न्यायालयात जाण्याची तयारीही दर्शविली आहे. त्यामुळे नेमकी चूक कोणाची असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
बोगस मतदानारून “या” केंद्रावर झाली प्रतिस्पर्ध्यामध्ये वादावादी
पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला असून आज मंगळवारी सकाळी बेळगांव तालुक्यातील कंग्राळी (खुर्द) येथे बोगस मतदानावरून दोन उमेदवारांमध्ये वादावादीचा प्रकार घडला.
कंग्राळी (खुर्द) येथील प्रभाग क्र. 7 मध्ये आज सकाळी मतदान प्रक्रियेला सुरळीत प्रारंभ झाला. मात्र कांही कालावधीनंतर बोगस मतदान होत असल्याच्या संशयावरून दोन प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये जोरदार वादावादी झाली. तथापि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा वाद मिटविला. सदर प्रकारामुळे बोगस मतदान रोखण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1289250701432520/