कोरोना संसर्गाचा प्रसार वेगाने आणि झपाट्याने पुन्हा पसरत चालला आहे. ब्रिटनमध्ये होत असलेल्या फैलावाच्या आणि भारतात आणि पर्यायाने कर्नाटकात याचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीसाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी संपूर्ण कर्नाटकात रोज रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कर्फ्यूचा आदेश दिला आहे.
या आदेशाची अंमलबजावणी बुधवार दि. २३ डिसेंबर पासून संपूर्ण राज्यात होणार असून हा कर्फ्यू २ जानेवारी २०२१ पर्यंत लागू असणार आहे. ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी हा आदेश बजावला आहे.
इंग्लंड मध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. या विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत असून हजारो लोकांचे जीव या नव्या विषाणूमुळे गेले आहेत. संपूर्ण जगासह भारतातही इंग्लंडमधील विमाने रद्द करण्यात आले असून इंगलमधून येणाऱ्या व्यक्तीला भारतात प्रवेध देण्यात येणार नाही. या विषाणूचा प्रसार वेगाने वाढत चालला असून याची धास्ती घेत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी नाईट कर्फ्यू चा निर्णय घेतला आहे.
बेळगावमध्ये दोन दिवसांपूर्वी ब्रिटनमधील महिला आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आली होती. सदर महिलेचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. परंतु तरीही संबंधित महिलेला ‘अंडर ऑब्सर्व्हेशन’ ठेवण्यात आले आहे.
संपूर्ण राज्यात हा कर्फ्यू घोषित करण्यात आला असून आगामी नव्या वर्षाच्या जल्लोषावर आता विरझन पडले आहे. प्रशासनाने अगोदरच हा आदेश जारी केला असून नववर्षाचे स्वागतही यंदा घरीच राहून प्रत्येकाला करावे लागणार आहे. शहर आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागताच्या पार्ट्याही यंदा संपूर्णपणे बंद असणार आहेत. शिवाय तालुक्यात आणि उपनगरांमध्ये होणाऱ्या ओल्या पार्ट्यांवर देखील कोरोना विषाणूच्या नव्या परवाने विरझन घातले आहे.