सुळगे (हिं) येथील श्री धर्मवीर संभाजी युवक मंडळ व श्री संगोळी रायान्ना युवक मंडळ आयोजित आणि सिने प्रोडूसर गणपत पाटील पुरस्कृत जीवनसंघर्ष फाउंडेशन क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद नमो स्पोर्ट्स (सुळगे) संघाने पटकावले.
सुळगे (हिं) येथील मराठी शाळेच्या मैदानावर सदर स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात एसआरएस अनगोळ पॅंथर संघाने प्रतिस्पर्धी कलमेश्वर बॉईज संघाला पराभूत केले.
त्याच प्रमाणे दुसऱ्या उपांत्य सामन्यात जेएसएफ + नमो स्पोर्ट्स (सुळगे) संघाने प्रतिस्पर्धी किंग ऑफ किंग्ज संघावर विजय मिळविला. स्पर्धेचा अंतिम सामना एसआरएस अनगोळ पँथर्स आणि नमो स्पोर्ट्स (सुळगे) यांच्यात खेळविला गेला.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एसआरएस अनगोळ पॅंथर संघाने 6 षटकार 45 धावा काढल्या. हे आव्हान यशस्वीरित्या खेळताना नमो स्पोर्ट्स संघाने 5 षटकात 46 धावा झळकावत सामना जिंकून स्पर्धेचे विजेतेपद हस्तगत केले.
विजेत्या नमो स्पोर्ट्स (सुळगे) संघांमध्ये शेखर, आकाश, ब्रम्हानंद, अर्जुन, प्रकाश, मयूर, वैजू, राकेश व रोहन या खेळाडूंचा समावेश होता. सदर स्पर्धेला क्रिकेट शौकिनांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.