सध्या ग्राम पंचायत निवडणूक प्रचार जोरात सुरू असून सगळीकडे मटण पार्ट्या चिकन पार्ट्या सुरू आहेत रात्रीच्या वेळी पार्टी संपवून घरी परतवेळी चोर आहे असे समजून एका व्यक्तीवर हल्ला करत खून केल्याची घटना मारिहाळ पोलीस स्थानक व्याप्तीत घडली आहे.
आनंद मारुती कोलकार वय 58 रा.मुचंडी बेळगाव असे खून झालेल्या दुर्दैवी व्यक्तीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद हा धाब्यावर पार्टी करून घरी परतत होता त्यावेळी खणगाव गावच्या हद्दीत त्याला चोर असे समजून त्याचावर हल्ला करून खून केल्याची शक्यता आहे.
या प्रकरणी मारिहाळ पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
गेल्या आठवड्यात बेळगाव तालुक्यातील खुनाची ही तिसरी घटना आहे जूने बेळगाव येथे युवकाचा तर माळ मारुती येथे पती कडून पत्नीचा खून केल्याच्या घटना घडल्या होत्या.