Sunday, January 26, 2025

/

एपीएमसीतील सर्व व्यवहार सोमवारी बंद

 belgaum

बाजार उपकर ०.३५ टक्क्यावरून १ टक्क्यापर्यंत वाढविल्याच्या निर्णयामुळे बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) सर्व व्यवहार सोमवारी दि. २१ डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी आपला माल समितीमध्ये आणू नये, तसेच मालाची पट्टी घेण्यासाठीही येऊ नये, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.

यासंदर्भात रताळी, बटाटा, गूळ मार्केट असोसिएशनकडून एपीएमसी सचिवांना निवेदन देण्यात असून या बंदमध्ये कांडा मार्केट मधील व्यापारीही सहभागी होणार आहेत.

रविवार दि. २२ डिसेंबर रोजी यासंदर्भात रताळी, गूळ मार्केट असोसिएशनची बैठक झाली. या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. एपीएमसी व्यापाऱ्यांकडून शेकडा कर आकारणी करते. यापूर्वी हा कर १ रुपये होता. याला व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर हा कर ०.३५ टक्के करण्यात आला होता. मात्र पुन्हा हा कर १ रुपये करण्यात आला असून या निर्णयामुळे व्यापारीवर्गात नाराजी व्यक्त होत आहे.

 belgaum

कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने (केसीसीआय) ने या निर्णयाविरोधात एपीएमसी बंद पुकारला आहे. या बंदला बेळगाव एपीएमसी असोसिएशन व व्यापाऱ्यांनीदेखील पाठिंबा दर्शविला आहे.

प्रत्येक सोमवारी एपीएमसीमध्ये व्यवहार कमी असतात. मात्र शेतकरी मालाची पट्टी व पैसे घेण्यासाठी व्यापाऱ्यांकडे येतात. सोमवारी व्यापाऱ्यांनी कुलूपबंद आंदोलन पुकारल्यामुळे शेतकऱ्यांनी एपीएमसीत येऊ नये, असे आवाहन केले आहे.

बैठकीला बटाटा, रताळी मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष एन. एस. झंगरचे, उपाध्यक्ष चेतन खांडेकर, सचिव माणिक होनगेकर, विनायक होनगेकर, नरसिंह पाटील, राजू जाधव, राहुल होनगेकर, विक्रमसिंह कदम – पाटील, सुरेश जाधव, मोहन कुंटे आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.