सध्या ग्राम पंचायत निवडणूकीचा प्रचार आणि धामधूम जोरात सुरू आहे त्यातच बेळगाव ग्रामीण भागात तर प्रचार जोरदार शिगेला पोहोचला आहे.महाराष्ट्र एकीकरण समिती भाजप आणि काँग्रेस अशी त्रिशंकू लढत याठिकाणी पहायला मिळत आहे.
विधानसभेत कुककर वाटणाऱ्यांनी देखील जोरदारपणे आपापले उमेदवार निवडणूक आणण्यासाठी कंबर कसली असताना ग्रामीण मधील काही मराठा समाजातील नेत्यांची पक्ष विरहित बैठक पार पडली.बैठकीत भाजप सह समितीच्या नेत्यांनी देखील हजेरी लावली होती. मतदारसंघात ग्रामीण मात्र खलबते गोकाक मध्ये असंच वर्णन या बैठकीचे करावे लागेल.
बेळगाव ग्रामीण भागातून काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करू असा निर्धार बेळगाव भागातील मराठा समाजाच्या नेत्यानी केला आहे. रविवारी गोकाक मुक्कामी पालकमंत्री रमेश यांच्या सोबत रमेश जारकीहोळी यांची बैठक झाली या बैठकीत आगामी ग्राम पंचायत निवडणुकीत ग्रामीण भागातून काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करू असा निर्धार अनेक नेत्यांनी व्यक्त केला.
रमेश जारकीहोळी यांनी मराठा नेत्यांची बैठक घेतली भाजपमधून मराठा समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी जारकीहोळी प्रयत्नशील आहेत अनेकदा त्यांनी भाजपचे ग्रामीण मतदारसंघातील विधानसभेचं तिकीट मराठा समाजाला द्यावं अस बोलून दाखवलं आहे.
बेळगाव तालुक्यातील माजी महापौरासह अनेक भाजप मधील मंडळी देखील कामाला लागली आहेत.ग्रामीण भागातील मराठी माणसाचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतृत्व सुस्त झाल्याने भाजप मधील मराठा नेत्यांचे काम संपर्क उठून दिसत आहेत.ग्राम पंचायत निवडणुकीच्या पाश्वभूमीवर तालुक्यातील मराठा नेत्यांनी ग्रामीण भागातील महिला नेत्याचे राजकारणातील पकड ढिली करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील बोलून दाखवले.
पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या बैठकीला केवळ भाजपचे नव्हे तर अनेक मराठा समाजातील आणि समितीतील नेते देखील उपस्थित होते.