मराठा समाज सुधारणा मंडळाची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश मरगाळे, कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सरचिटणीस जी. जी. कानडीकर, खजिनदार के. एल. मजूकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवराज पाटील यांनी केले. त्यानंतर अहवाल वाचन आणि मागील वर्षाचा आढावा सरचिटणीस जी. जी. कानडीकर यांनी घेतला. जमा-खर्च पत्रकाचे वाचन करून के. एल. मजूकर यांनी मंजुरी घेतली. यावेळी उपस्थित मराठा समाजातील गणेश दड्डीकर, शुभम शेळके, मोहन कंग्राळकर, प्रकाश बापू पाटील के. व्ही. खण्डेकर यांनी मंडळाच्या कार्याबाबत मौलिक सूचना केल्या.
या बैठकीत मराठा समाज सुधारणा मंडळाच्या नूतन इमारतीच्या उर्वरित कामाची सुरुवात लवकरात लवकर कर्यात यावी, आणि इमारत पूर्णत्वास नेण्यात यावी, यासंबंधी चर्चा करण्यात आली. तसेच कोविड मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सध्या वधू-वर सूचक मंडळाचे कार्य थांबले आहे.
येत्या १ जानेवारीपासून दरारोज या कार्याची अंमलबजावणी केली जाईल, तसेच मराठा समाजातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी चर्चा करण्यात आली.
या बैठकीला शंकर पाटील, अनंत जांगळे, रघुनाथ बांडगी आणि मराठा समाजातील मान्यवर उपस्थित होते. आभार मोहन सप्रे यांनी मानले.