मराठा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला सरकारी लेखा परीक्षणानुसार ऑडिट “ए” वर्ग मिळाला असून यंदाच्या अहवाल साली बँकेने 2 कोटी 50 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमविला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी दिली आहे.
मराठा बँकेची 78 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या 22 डिसेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना चेअरमन दिगंबर पवार यांनी उपरोक्त माहिती दिली. “ग्राहक देवो भव” या उक्तीप्रमाणे मराठा बँकेने नेहमीच ग्राहक सेवेला प्राधान्य दिले आहे असे सांगून दिगंबर पवार यांनी पुढीलप्रमाणे अधिक माहिती दिली. 2019 -20 साली बँकेची सभासद संख्या 11,937 इतकी झाली असून एकूण ठेवी 130 कोटी 20 लाख रुपये इतक्या आहेत. सभासदांच्या ठेवी सुरक्षतेसाठी बँकेने 5 लाखापर्यंत विमा उतरविला आहे.
बँकेचे भाग भांडवल 2,71,79,300 रुपये इतकी असून रिझर्व व इतर फंड 54,79,33,837 रुपये इतका आहे. बँकेने 97,42,84,435 रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. मराठा बँकेची गुंतवणूक 88,99,33,835 रुपये इतकी असून खेळते भांडवल 197,13,11,603 रुपये इतके आहे. सरकारी लेखा परीक्षणानुसार यंदा सलग तिसऱ्या वर्षी बँकेला ऑडिट “ए” वर्ग मिळाला असून 2019 -20 अहवाल साली बँकेने 2,50,00,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे.
सामाजिक उपक्रम राबवत बँकेने आर्थिक दृष्ट्या अग्रक्रम क्षेत्रास महत्त्वपूर्ण 72.72 टक्के आणि दुर्बल घटक आस 43.74 टक्के कर्जाचे वितरण केले आहे. बँकेने आधुनिक तंत्रज्ञान अंगीकारून ग्राहकांना आधुनिक तत्पर सेवा प्रदान केली आहे. दरवर्षी बँकेतर्फे दहावी आणि बारावी परीक्षेत विशेष गुणवत्तेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या सभासदांच्या मुलांना रोख रक्कम व मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाते.
बँकेने अनेक शैक्षणिक संस्थांना भरीव आर्थिक सहाय्य केले असल्याचेही मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी सांगितले. त्याप्रमाणे मराठा बँकेची 78 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या मंगळवार दि 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता खानापूर रोडवरील मराठा मंदिरच्या सभागृहात होणार आहे. तेंव्हा सभासदांनी याची नोंद घेऊन सभेला वेळेवर हजर राहावे, असे आवाहनही पवार यांनी केले. यावेळी राष्ट्रीयकृत बँकेच्या तोडीला तोड लावून सध्या सगळ्या ग्राहकांच्या सगळ्या सोयी उपलब्ध करून देण्याचे काम त्यात प्रामुख्याने ए टी एम आर टी जी एस एन एफ टी आणि मोबाइल डिजिटल बँकिंग उपलब्ध करून देत आहे अशी बाळासाहेब काकतकर यांनी दिली.यावेळी सुनील अष्टेकर, बाळाराम पाटील,शेखर हंडे, निना काकतकर,विनोद हंगिरकर,रेणू किल्लेकर,मोहन चौगुले लक्ष्मण नाईक आदी उपस्थित होते.