बेळगांव जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीमध्ये नुकत्याच झालेल्या लोक अदालतीमध्ये 11,204 इतके विक्रमी खटले निकालात काढण्यात आले असून 110.62 कोटी रुपयांहून अधिक भरपाई देण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.
जिल्हा कायदा प्राधिकार, न्यायालय खाते, जिल्हा प्रशासन, पोलिस खाते आणि बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा मुख्य आणि सत्र न्यायाधीश, जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे अध्यक्ष सी. एम. जोशी आणि पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी पक्षकारांसोबत ऑनलाईन पद्धतीने खटल्याचे काम पाहिले. याप्रसंगी परस्पर संमतीने प्रकरणे निकालात काढण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व न्यायालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही मेगा लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारची 35,354 प्रकरणे हाताळण्यात आली यापैकी 11,204 प्रकरणे निकालात काढण्यात आली.
लोक अदालतीमध्ये तिसऱ्या सत्र अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम एच अण्णय्य, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा कायदा प्राधिकारचे सचिव विजय अरस, सरकारी अभियोजक आणि वकील उपस्थित होते.