ब्रिटनमधील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली असून या धास्तीने कर्नाटकात आजपासून नाईट कर्फ्यू जारी करण्याची सूचना देण्यात आली आहे. परंतु विरोधक कोणत्याही संदर्भाशिवाय विरोध करार असून जिवापेक्षा कोणतीही गोष्ट महत्वाची नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
बेळगाव सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पूर्वखबरदारीची उपाययोजना म्हणून नाईट कर्फ्यू चा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून राज्यात ९ दिवसांसाठी हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असून या काळात बससेवा स्थगित होणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बससेवेला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. रात्री बससेवा सुरु ठेवण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचे मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केले आहे.
टॅक्सी, बार मालक हे या कर्फ्यूला विरोध करण्याच्या तयारीत आहेत. परंतु आपला जीव अमूल्य आहे. जीव आहे तर जीवन आहे. यासाठी आपल्या जीवाचे रक्षण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. या नाईट कर्फ्यूसंदर्भात सायंकाळी ५ वाजता मार्गसूची जाहीर करण्यात आली आहे.