किडनी विकाराने त्रासत राहूल साठी धावले मदतीचे हात देसाई गल्लीतील युवकांनी वाय. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी जाऊन मदत मागितली पहिल्या टप्प्यात चौदा हजार रुपये रोख जमा करत सदर रक्कम त्याच्या पीडितांच्या आई वडीलांच्या कडे सुपूर्द करण्यात आली.
गर्लगुंजी येथील राहुल बिदरभाविकर हा 20 वर्षीय युवक किडनी विकाराने त्रस्त आहे. त्याला समाजातील दानशूर व्यक्ती,रोटरी क्लब ,लायन्स क्लब, इनर व्हील आणि इतर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन फेसबुक फ्रेंडस सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर व हेल्प फॉर नीड या संस्थेच्या माधुरी जाधव यांनी केले आहे.
सदर वीस वर्षीय तरुण कारखान्यात रोजंदारीवर जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. कोरोनामुळे त्याच्यावर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली.राहूलच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे .वडील गवंडी काम करतात तर आई मोलमजुरी करून कसे बसे घर चालवत आहेत.
अचानक आलेल्या संकटामुळे राहूलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.डॉ.देवदत्त देसाई यांनी निदान करून त्याला सद्य स्थितीत डायलासीस करण्याचा सल्ला दिला असून श्रीप्रभा हॉस्पिटल येथे राहुलवर उपचार चालू आहेत.राहूलच्या कुटुंबियांना उपचाराचा खर्च परवडण्यासारखा नाही. उपचारासाठी या कुटुंबाला मदतीची अत्यंत गरज आहे.
ज्या दानशूर व्यक्तींना या कुटूंबाला आर्थिक मदत करायची असेल त्यांनि कर्नाटक ग्रामीण विकास बँक,शाखा गर्लगुंजी येथील त्याच्या ac no. 89059682631 (ifsc code kVGB0002603)या वर आपली मदत जमा करावी व अधिक माहितीसाठी 9071207625 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.