काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असूनही आज विधानभवनात गोहत्या प्रतिबंधक विधेयक पास करण्यात आले. या कायद्यांतर्गत गोहत्येवर काटेकोरपणे निर्बंध घालण्यात आले आहेत.
भाजपच्या बेळगाव येथे झालेल्या कार्यकारिणी बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. विधानसभेत गोहत्या प्रतिबंध कायदा अंमलात आणण्यासंदर्भात सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती अनेक नेत्यांनी दिली होती. यानुसार आज विधानसभेत हा ठराव मांडून पास करण्यात आला आहे.
हा ठराव विधानभवनात मांडण्यात आला त्यावेळी विरोधी पक्षांनी या कायद्याला जोरदार निषेध केला. परंतु सर्वाधिक मताने हे विधेयक अखेर पास करण्यात आले. विधानसभेत गोहत्या संबंधी ठराव मांडण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ सुरु केला.
या ठरावासंदर्भात आधीच्या सभेत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसताना सरकार हे विधेयक अचानकपणे मांडून पस करून घेत आहे, या गोष्टीला विरोधी पक्षांनी विरोध केला.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी हा मुद्दा उचलून धरत बहिष्कार घालण्याचा प्रयत्न केला. परंतु या बहिष्काराचा कोणताच उपयोग न होता विधानसभेत सर्वाधिक मतांनी हे विधेयक पास करण्यात आले आहे.