Monday, November 18, 2024

/

या समस्येवर प्रथम तोडगा काढा मग कारवाई करा : गृहमंत्र्यांची पोलीस खात्याला सूचना

 belgaum

बेळगांव शहरातील वाहतुकीच्या समस्येवर प्रथम तोडगा काढा आणि त्यानंतर वाहनचालकांवर दंडात्मक अथवा अन्य कारवाई करा, अशी कडक सूचना राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे.

शहरातील सिटिझन्स कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मंगळवारी बेळगांवातील वाहतूक समस्येसंदर्भात बेळगाव सरकारी विश्रामधाम येथे गृहमंत्री बोम्मई यांना निवेदन सादर केले. निवेदनाचा स्वीकार करून तसेच सिटीझन्स कौन्सिलच्या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गृहमंत्र्यांनी उपरोक्त सूचना केली. तसेच बेळगांवातील वाहतुकीची समस्या कायमची निकालात काढण्यासाठी आपण जातीने लक्ष घालू असे आश्वासनही त्यांनी दिले.

प्रारंभी युवा पिढीला अंमली पदार्थापासून सुरक्षित करण्यासाठी राज्यात अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात जोरदार मोहीम उघडून ड्रग रॅकेटचे कंबरडे मोडल्याबद्दल सिटिझन्स कौन्सिलतर्फे सतीश तेंडुलकर यांनी गृहमंत्री बसवराज बोम्मई यांचे अभिनंदन केले.

Citizen council
Citizen council

बेळगांव शहरातील वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दिवसाला 150 ते 200 नवी वाहने रस्त्यावर येत आहेत. तथापि या वाहनांसाठी पुरेशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली नाही. तथापि बेशिस्तपणा आणि चुकीच्या जागी पार्किंग केल्याबद्दल वाहनचालकांना दंड करणे अथवा त्यांची वाहने जप्त केली जात आहेत. या पद्धतीने प्रशासनाकडून पार्किंगची सोय न केलेली नसताना वाहनचालकांना दंड आकारणे हे अनैतिक आहे. त्यामुळे सध्याची वाहतूक व्यवस्था व वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरात चार मल्टिलेव्हल पार्किंग कॉम्प्लेक्स उभारावेत. बेळगांव हे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व गोवा राज्याच्या सीमेवरील शहर आहे. शैक्षणिक केंद्र असण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात विकसित होणारे व्यापार व उद्योग धंद्याचे केंद्र बनत असलेल्या बेळगावमध्ये परराज्यातून वाहने घेऊन येणाऱ्या लोकांना पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. हा प्रकार त्वरित थांबवला जावा आणि बेळगांवातील व्यापार आणि उद्योगाला प्रोत्साहित करण्यासाठी उदार मनोवृत्ती ठेवली जावी

बेळगांवला रिंगरोड नसल्यामुळे अवजड वाहने शहरातून ये-जा करत असतात. याला आळा घालण्यासाठी काकती व देसूर येथे ट्रक टर्मिनल स्थापन करावेत. चोरी आणि वाटमारीचे प्रकार लक्षात घेऊन गोव्याकडे जाणाऱ्या किणये ते चोर्ला दरम्यानच्या महामार्गावर हायवे पेट्रोलिंग स्क्वाड सुरू करावे. शहरातील बाजारपेठ आणि व्यावसायिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि वॉर्डनिहाय सार्वजनिक तक्रार निवारण केंद्रं सुरू करावीत अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

सदर निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात विकास कलघटगी, राकेश कलघटगी, ॲड. एन. आर. लातूर आदींचा समावेश होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.