हिंडलगा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामविकास लोकशाही आघाडीच्या माध्यमातून हिंडलगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रामचंद्र मन्नोळकर निवडणूक लढवीत आहेत. २००५ सालापासून आतापर्यंत हिंडलगा ग्रामपंचायतीवर बहुमताने निवडून आले असून २००५ सालापासून आपल्या प्रभागाचा आणि संपूर्ण गावचा विकास याला प्राधान्य देण्यात आले आहे.
२००५ साली निवडून आल्यानंतर अडीज वर्षे सदस्य म्हणून तर अडीज वर्षानंतर उपाध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतीत कार्यरत असणारे रामचंद्र मन्नोळकर यांनी गावच्या स्वच्छतेचा प्रश्न सोडविला. परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छता अभियान राबविले. आणि याच कालावधीत ग्रामपंचायतीला निर्मलग्राम पुरस्कार मिळवून दिला. या पुरस्काराच्या बक्षिसाची रक्कम कचरा गाडी खरेदी करण्यासाठी सत्कारणी लावली.
गावात दररोज कचऱ्याची उचल नियमितपणे केली जाते. राज्यातील निर्मलग्राम गावांपैकी हिंडलगा गावचे नाव घेतले जाते. यासोबतच आजपर्यंतच्या कालावधीत गावच्या विकासाला प्राधान्य देत, गटारी, गटारींची स्वच्छता, गॅस पाईपलाईन जोडणी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हिंडलगा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने रामचंद्र मन्नोळकर यांनी प्रयत्न केले असून मागील पाच वर्षात ग्रामपंचायतीवर सत्ता नसूनही राष्ट्रीय पक्षाच्या मदतीने १.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेऊन गावातील उर्वरित विभागाच्या विकासाची कामे केली आहेत. संपूर्ण गावात गॅस पाईपलाईन जोडण्याची कामे करण्यात आली आहेत. याशिवाय रेशन कार्ड, कामगार योजना अशा अनेक योजना गावकऱ्यांसाठी मन्नोळकरांनी राबविल्या आहेत. यंदा झालेल्या अतिवृष्टीत ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे, त्यांना नुकसान भरपाईही देण्यात आली आहे.
२०१५ साली झालेल्या निवडणुकीत त्यांची अध्यक्षपदी निवड झाली असून सध्या निवडणूक रिंगणात उतरण्याची त्यांची ही चौथी वेळ असून या निवडणुकीत जनतेने आपल्याला बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
आगामी काळात ग्रामपंचायतीवर निवडून आल्यानंतर आधीप्रमाणेच आताही विकासकामे, घरोघरी फिल्टर नळ, महिलांना रोजगार मिळवून देणे, हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीत नव्या उद्योगांना प्राधान्य देऊन युवकांना रोजगार मिळवून देणे, तसेच बेळगाव स्मार्ट सिटीच्या धर्तीवर हिंडलगा स्मार्ट व्हिलेज बनविण्याचे आश्वासन त्यांनी जनतेला दिले आहे. २०२० च्या निवडणुकीत हिंडलगा ग्रामपंचायतीतील प्रभाग क्रमांक 2 मधून रामचंद्र मन्नोळकर हे निवडणूक लढवित असून ‘बॅट’ हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे.
लोकशाही विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवीत असणाऱ्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन रामचंद्र मन्नोळकर यांनी केले हिंडलगा गावातील जनतेला केले आहे.