Monday, January 20, 2025

/

राज्यातील पहिल्या हायटेक फिलैटलीक ब्युरोचे झाले उद्घाटन

 belgaum

देशभरातील अनेक ऐतिहासिक पोस्ट तिकीटांचा समावेश असणाऱ्या कर्नाटकातील पहिल्या हायटेक फिलैटलीक ब्युरोचा उद्घाटन समारंभ आज बुधवारी दुपारी बेळगांवात मोठ्या उत्साहात पार पडला.

बेळगांव पोस्ट ऑफिसमध्ये साकारण्यात आलेल्या या राज्यातील पहिला हायटेक फिलैटलीक ब्युरोच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकाच्या मुख्य पोस्टमास्तर शारदा संपत व धारवाडच्या पोस्टमास्तर जनरल अविनाश श्रीनिवास या उपस्थित होत्या. या दोघांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच फीत कापून हायटेक फिलैटलीक ब्युरोचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बेळगाव पोस्ट ऑफिसचे सुपरिटेंडेंट एस. डी. कुलकर्णी, एएसपी एम. के. पत्तल, एएसपी उमराणी, पोस्टमास्तर सी. एम. हिरेमठ, असिस्टंट पोस्टमास्तर पी. एस. कलपत्री आदी पोस्ट खात्यातील अधिकारी कर्मचारी आणि निमंत्रित उपस्थित होते.

बेळगांव पोस्ट विभागाने पूर्वीचा पासपोर्ट कार्यालयातील खुल्या जागेत हा अत्याधुनिक असा फिलॅटली क्लबच्या सुरू केला आहे. विद्यार्थी तसेच पोस्ट तिकिटांची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी हा क्लब महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. दरम्यान शताब्दी साजरा केलेले बेळगांवचे सार्वजनिक वाचनालय आता पोस्ट खात्याच्या लिफाफ्यावर येणार आहे. वाचनालयासोबतच शेकडो वर्षाच्या इतिहासाची साक्ष देणारी किल्ल्यातील कमलबस्ती, पांगुळ गल्ली येथील दक्षिण भारतातील एकमेव श्री अश्वत्थामा मंदिर व सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवी मंदिर देखील लिफाफ्यावर येणार आहे.Post bgm

या लिफाफ्यांचे अनावरण आजच्या उद्घाटन समारंभप्रसंगी करण्यात आले. एकंदर बेळगांवच्या ऐतिहासिक ठेव्याची माहिती पोस्ट खात्यामुळे आता देशभर पसरणार आहे.

भारतीय पोस्ट खात्याने आतापर्यंत भारताचा इतिहास महिला साक्षरता पोस्टाचा इतिहास क्रीडा भारतीय सेना यावर आधारित 2000 च्या घरात तपाल तिकिटांची छपाई केली आहे. यातील निवडक तिकिटांचा संग्रह करून त्याचे हायटेक फिलैटलीक ब्युरोच्या स्वरूपातील दालन बेळगांव पोस्ट विभागाने उभारले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.