हालगा – मच्छे बायपास रस्त्यामध्ये हालगा येथील सुरेश नागेंद्र मऱ्याक्काचे यांच्या छोट्या शेत जमिनीचे भूसंपादन केल्याने या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. तथापि यासंदर्भात सुरेश मऱ्याक्काचे यांनी पत्राद्वारे केलेल्या थेट तक्रारीची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली असून ग्रामपंचायत निवडणुकीनंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हालगा – मच्छे बायपास रस्त्यामध्ये हालगा येथील सुरेश नागेंद्र मऱ्याक्काचे यांच्या छोट्या शेत जमिनीचे भूसंपादन केल्याने त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यातच घरी आई अर्धांगवायूनेग्रस्त तर आता शेती गेल्यामुळे वडिलांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. सुरेश यांचे वडील न सांगता घरातून हातात विळा घेऊन निघून दुसऱ्यांच्या शेतात जाऊन काम करतांना अनेक शेतकऱ्यांनी पाहिले आहे.
आता सुरेश हे शेतीला पर्यायी व्यवसाय म्हणून इतर छोटी काम करत असतात.
शेती बायपासमधे गेल्याच्या चिंतेने आई, वडिलांची झालेली अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या सुरेश यांनी थेट मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीनां पत्र पाठवले होते. मात्र प्रत्युत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी आणखी चार पत्रं पाठवली. अखेर त्याची दखल घेऊन बागेवाडी सर्कलनीं त्याच्यांशी संपर्क साधून विचारपूस केली. तसेच आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचली आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत येऊन शहनिशा करु म्हणून आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालयाने सुरेश मऱ्याक्काचे यांची पीएमओमध्ये तक्रार दाखल केलेला क्रमांक त्यांच्या मोबाईलवर पाठवला आहे.
आता इथूनपूढे कोणती कार्यवाही होणार याकडे सुरेश मऱ्याक्काचे यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण बेकायदेशीर बायपासचा लढा मा. उच्च न्यायालयात धाडसाने लढत प्रसंगी बँकेत कर्ज काढून शेतकऱ्यांनी जिंकला आहे. आता पाहावे लागणार कि शासकीय अधिकारी काय निर्णय घेतात? तथापी कांही काअसेनां पंतप्रधानांनी दखल घेतली हे महत्वाचे असे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
याआधीही या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी तक्रार केली होती, पण त्याचा कांहीच फायदा झाला नव्हता. जर प्रामाणीक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे जाणिवपूर्वक लक्ष देऊन शहनिशा केली असती तर हालगा – मच्छे बायपास प्रकरणी नक्कीच शेतकऱ्यांना न्याय मिळाला असता. मात्र तसे घडले नाही आणि मा. उच्च न्यायालयाकडून शेतकऱ्यांना न्याय मिळाला. मात्र यासाठी येथील छोट्या शेतकऱ्यांना खूप पैसा खर्चून मनस्ताप भोगावा लागला.