Saturday, November 16, 2024

/

ख्रिसमस आणि नववर्षासाठी सरकारची मार्गदर्शक सूची जारी

 belgaum

कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर ख्रिसमस आणि नववर्ष कार्यक्रमासाठी कर्नाटक राज्य सरकारने गुरुवारी मार्गदर्शक सूची जारी केली असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना प्रादुर्भावाचे संकट लक्षात घेऊन राज्यात ख्रिसमस व नववर्ष कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार येत्या 30 डिसेंबर 2020 ते 2 जानेवारी 2021 या कालावधीत कर्नाटकातील कोणत्याही शहरात डीजे पार्टी अथवा डान्स पार्टीचे आयोजन करण्यावर बंदी असणार आहे. तथापि कर्नाटकचे मुख्य सचिव टी. एम. विजय यांच्या आदेशानुसार पब्ज आणि बार नेहमीप्रमाणे खुले राहतील.

कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता कमी करण्यासाठी सरकारने हस्तांदोलन आणि गळाभेट (मिठी मारणे) घेण्यावर बंदी घातली आहे. चर्च मधील धार्मिक कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टंसिंगसह सॅनिटायझर आणि मास्कचा वापर सक्तीने केला जावा.

ख्रिसमस निमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनात परवानगी असली तरी सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा नियम सक्तीने पाळला जावा. रेस्टॉरंट आणि अन्य आस्थापनांमध्ये प्रवेश करणार्‍या नागरिकांचे टेंपरेचर स्क्रीनिंग केले जावे

सरकारने येत्या 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत रेस्टॉरन्ट क्लबस् आणि पब्जमधील खास मेजवान्या व डीजे पार्ट्या आयोजित करण्यावर बंदी घातली आहे. तथापि सुरक्षा नियमांचे पालन करून क्लब, पब आणि रेस्टॉरंट नेहमीप्रमाणे खुले ठेवण्यास परवानगी असेल.

वरील कालावधीत 10 वर्षाखालील लहान मुलांसह 65 वर्षावरील वृद्धांनी घरातच राहावे. 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांनी सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये.

खुल्या जागेतील तसेच घरगुती अथवा अपार्टमेन्ट -कॉम्प्लेक्समधील मेजवानांसाठी देखील सुरक्षा नियम लागू असतील. रस्त्यावर अथवा महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करून गर्दी करण्याच्या प्रकारावर कडक बंदी असणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना परिस्थितीनुसार आपल्या जिल्ह्यात आणि शहरात अतिरिक्त बंदी आदेश लागू करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.