ग्रामपंचायत निवडणूक -२०२० च्या पार्श्वभूमीवर नेमणूक करण्यात आलेले निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अनुचित प्रकाराबाबतीत सावधानता बाळगून कार्य करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे.
पहिल्या टप्प्यात पार पडणाऱ्या निवडणूकांसाठी विविध तालुक्यातील प्रशिक्षण केंद्रांना गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचनाही दिल्या. निवडणूक प्रक्रियेबाबत कोणत्याही पद्धतीची शंका असल्यास कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करावी, आणि शंकांचे निरसन करावे, निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीनुसार देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, निवडणुकीत सुसूत्रता आणण्यासाठी सर्वप्रकारे खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कित्तूर, बैलहोंगल, गोकाक, मुडलगी येथील प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पोलीस वरिष्ठाधिकारी लक्ष्मण निंबरगी आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.