राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक होणार असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अडचणी आल्यास अडचणी निवारण्यासाठी तक्रार कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
यासाठी हेस्कॉमचे व्यवस्थापक संचालक (प्रशासन आणि मानव संसाधन) इब्राहिम मैगुर यांची निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
शुक्रवार दि. ११ डिसेंबर पासून बेळगावमधील सर्किट हाऊसच्या जुन्या इमारतीत, खोली क्रमांक ९ मध्ये इब्राहिम मैगुर हे वास्तव्यास असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा ते दौरा करणार आहेत.
यादरम्यान जनतेने त्यांना संपर्क साधावा, ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान कोणत्याही पद्धतीची अडचण असल्यास त्यांच्या ९४८०८८१००० या मोबाईल क्रमांकावर अथवा obsblgep20@yahoo.com या ईमेल वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक २०२० संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.


