निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजवले आहे. दिनांक 22 व 27 डिसेंबर असे दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. सध्या बेळगावात तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची धांदल उडाली आहे. त्यामुळे अनेक गावात जोरदार तयारीही सुरू झाली आहे. बाळेकुंद्री खुर्द येथे काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.
याचबरोबर सत्ता आणण्यासाठी सत्ताधारी आणि अपक्ष पार्टी जोरदार तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. मागील वेळी बाळेकुंद्री खुर्द येथे भाजपप्रणीत ग्राम विकास आघाडीची सत्ता होती ती टिकून ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत तर काँग्रेस प्रणीत ग्राम विकास आघाडी पाडाव करण्यासाठी मोठे प्रयत्न करत असल्याचे चर्चा जोरदार सुरू आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर नेमकी कुणाची सत्ता असणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
गावचा विकास या दृष्टिकोनातूनच अनेक जण प्रयत्न करत आहेत तर काही अपक्ष उमेदवार ही इच्छुक असून त्यांनीही आपली तयारी सुरू केली आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात विविध विकास कामे राबविण्याच्या दृष्टिकोनातून अजंठा नागरिकांसमोर मांडण्यात येत आहे. त्यामुळे सध्या बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायत कोणाच्या हाती जाणार याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.
दरम्यान सत्ताधारी आणि अपक्ष यांच्यात काटे की टक्कर होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाळेकुंद्री खुर्द ग्रामपंचायतीवर कुणाचा झेंडा लागणार आणि यासाठी कुणाचे पॅनल निवडून येणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. सध्या या परिसरात जोरदार रणधुमाळी उडाली असून सत्तास्थापनेसाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत. नेमकी सत्ता कुणाची येणार याकडे सार्यांचे नजरा लागून राहिल्या आहेत.