ग्रामपंचायत निवडणुकीचा बेळगाव जिल्ह्यातील दुसरा टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठीही चुरशीने मतदान पार पडले आहे.
ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले असून बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड आणि रायबाग या तालुक्यातील 218 ग्रामपंचायतीसाठी मतप्रक्रिया पार पडली आहे.
दुसऱ्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत 3,587 जागांसाठी तब्बल 9,472 उमेदवार रिंगणात होते. रविवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मतदान केंद्रावर संपूर्ण व्यवस्था केली होती.
चोख पोलीस बंदोबस्त आणि कोरोना पार्श्वभूमीवर आशा कार्यकर्त्या आणि सरकारी नियमावलीचे पालन देखील करण्यात येत होते. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह पोलिस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी लक्ष पुरविले होते.