बेळगांव शहरामध्ये येत्या 5 डिसेंबर रोजी होणारी भाजप कोर कमिटीची बैठक आणि राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवार दि. 4 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा बेळगांव दौऱ्यावर येत आहेत.
बंगलोरच्या केंपेगौडा विमानतळावरून शुक्रवारी दुपारी 2.15 वाजता एअर इंडियाच्या विमानाने मुख्यमंत्री बेळगांव प्रवासाला निघणार आहेत.
या दिवशी सायंकाळी 7:30 वाजता युके 27 हॉटेलमधील राज्य भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत ते हजर राहणार आहेत. त्यानंतर रात्री बेळगांवातच मुक्काम करून 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या राज्य भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री उपस्थित राहतील.
या बैठकीनंतर सायंकाळी 7:30 वाजता एअर इंडियाच्या विमानाने मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पुन्हा माघारी बेंगलोरला रवाना होतील, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.