शनिवार दि. १२ डिसेंबर २०२० रोजी कृष्णा स्पीच थेरपी सेंटर आणि हिअरिंग क्लिनिकच्या ८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मोफत श्रवण आणि वाचा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात विविध समस्यांवरील तपासणी तसेच मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या तपासणीत ऐकू कमी येणे, कानातून आवाज येणे, दूरचे आवाज ऐकू न येणे, गोंगाटाच्या ठिकाणी स्पष्ट ऐकू न येणे, श्रवणयंत्रातून अस्पष्ट आवाज येणे यासोबतच लहानमुलांच्या वयानुसार तोतरेपणा, बोबडेपणा, स्वमग्नता, स्ट्रोक नंतर आलेले वाचेचे बधिरत्व या समस्यांवर क्लिनिकच्या १३ शाखांमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात डॉ. नागनाथ हे ऑडिओलॉजिस्ट तज्ञ म्हणून कानाच्या सर्व तपासण्या करणार आहेत. तसेच स्पीच थेरपिस्ट तज्ञ म्हणून राजेभाऊ राठोड हे बोलण्यासंदर्भातील सर्व समस्यांवर तपासणी करून मार्गदर्शन आणि सल्ला देणार आहेत. सध्या हे क्लिनिक काकतीवेस रोड येथील गुरु ऑप्टिकल्स, प्रसाद मेडिकल समोर सुरु आहे.
या शिबिरात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत ८०८८५५९२८९ या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी, तसेच गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्लिनिकच्या संचालकांनी केले आहे.