सरकारने जाहीर केलेले कृषी विधेयक मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांची देशभर आंदोलने सुरु आहेत.
याबरोबरच राज्यातही शेतकऱ्यांनी आंदोलने सुरूच ठेवली असून आज बेळगावमधील सुवर्णविधानसौध समोर पुन्हा शेतकरी जमून सरकारने कृषिविधेयक मागे घेण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची एक वेगळीच खासियत आज पहायला मिळाली.
या आंदोलनात शेतकऱ्यांनी चक्क सुवर्णविधानसौधसमोरील रस्त्यावर स्वयंपाक करून नाश्ता केला आणि सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
अनेक महिलांसह हे शेतकरी आंदोलन सुरु होते. या दरम्यान एनएच४ महामार्गाच्या सर्व्हिस रोड वर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडून चक्क चुली मांडल्या. आणि याचठिकाणी बसून त्यांनी नाश्ता आणि जेवणही केले. राज्यातील अनेक रयत संघटना, हसीर सेनांच्या सहित अनेक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.