कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरितसेना बेळगाव तालुका शाखेच्या नेतृत्वाखाली येळ्ळूर रोड येथील बेकायदेशीर केलेल्या हालगा – मच्छे बायपासमधील पीकाऊ जमीनीत जागतिक कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शहापूर, वडगांव, अनगोळ, मच्छे, जुने बेळगांव, हालगा व येळ्ळूर परिसरातील शेतकरी व महिलांनी आंदोलन करुन बंद पाडलेल्या येळ्ळूर रोड जवळील पीकाऊ जमीनीतील बायपासच्या जागेत आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी शेतकऱ्यांच्या एकजूटीचा विचार जय असो, कृषी दिन चिरायू होवो, कर्नाटक राज्य रयत संघटनेचा विजय असो, पीकाऊ जमीनी भूसंपादन करुन शेतकऱ्यांना देशोधाडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकरी विरोधी काळे कायदे अंमलात आणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा उपस्थित शेतकऱ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सदर जागतिक कृषी दिन कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांनी बैलगाडी व ट्रॅक्टर आणला होता.
याप्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव कागणीकर, कामगार संघटनेचे युवा कार्यकर्ते राजू गाणगेर, विलास घाडी आदींनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. याप्रसंगी शहर रयत संघटना अध्यक्ष हणमंत बाळेकूंद्री, मोनाप्पा बाळेकूंद्री, आनंदा काजोळकर, यल्लाप्पा तारिहाळकर, रयत संघटनेचे प्रकाश नायक, सुभाष चौगले, सुरेश मऱ्याक्काचे, अनिल अनगोळकर, रघुनाथ पैलवानाचे, महेश चतूर, भोमेश बिर्जे,तानाजी हालगेकर, येळ्ळूरचे शांताराम कुगजी, गोपाळ सोमणाचे, लक्ष्मण देमजी,
बाळू सावंत, महादेव पोटे, राजू बिर्जे, प्रितेश होसूरकर, विनायक हालगेकर, मारुती बिर्जे, मनोहर केरवाडकर, विठ्ठल बाळेकूंद्री, महिला शेतकरी कृष्णाबाई बिर्जे, गंगूबाई, रेणूका बाळेकूंद्रीसह शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी जागतिक कृषी दिन साजरा करत इथून पूढे येथील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास सामुहिकपणे मोठ्या लढ्यास कायम सिध्द राहु असा संकल्प केला.