सोशल साईट्सवर सध्या अनेक बातम्यांची रेलचेल सुरु आहे. परंतु या बातम्यांमध्ये किती तथ्य असते हे सर्वसामान्यांना तर माहित नसतेच. परंतु अशा बातम्यांची सत्यता शोधण्यासाठी आणि पडताळण्यासाठी तसेच ठोस बातम्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती विभागाच्या वतीने ‘फॅक्ट चेक’ या कार्यपद्धतीवर आधारित प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि. १४ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘फॅक्ट चेक’ या प्रशिक्षण शिबिरात गुगल संस्थेत विशेष प्रशिक्षण घेतलेले पत्रकार प्रमोद हरिकांत हे मार्गदर्शन करणार आहेत.
इच्छुकांनी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा वार्ताधिकारी यांच्या ९४४८५८९६३९ मोबाईल क्रमांक या व्हॉट्सअप नंबरवर आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण शिबिरात फोटो व्हेरिफिकेशन , व्हिडीओ व्हेरिफिकेशन, वेबनाईट व्हेरिफिकेशन, जिओ लोकेशन पत्ता, सोशल साईट्सची पडताळणी यासह अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.