मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे शिष्य समजले जाणारे बैलहोंगल चे माजी आमदार विश्वनाथ पाटील यांची घटप्रभा -मलप्रभा विकास प्राधिकरण अर्थात “काडा”च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी आमदार डाॅ. विश्वनाथ पाटील यांनी आज मंगळवारी सकाळी शहरातील कित्तूर चन्नम्मा चौकानजीकच्या काडा कार्यालयांमध्ये रितसर अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
डॉ. पाटील यांना चार दिवसापूर्वी कर्नाटक राज्य तेलबिया उत्पादन महामंडळ हुबळीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. आता त्यांना काडाचे अध्यक्ष करण्यात आले आहे. एका अर्थाने मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी आपल्या या शिष्याला एक प्रकारची दिवाळी दिवाळी भेटच दिली आहे. बेळगांवसह धारवाड, बागलकोट व गदग हे काडाचे कार्यक्षेत्र आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी यापूर्वी डॉ. पाटील यांना भाजप ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष पद दिले होते. आता त्यांच्याच कृपा कटाक्षामुळे डॉ. विश्वनाथ पाटील यांना काडाचे अध्यक्षपद मिळाले आहे.